ISBN No: 
978-81-7434-871-5

या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत.
या आहेत विज्ञान प्रयोगकथा.
आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून
केलेले प्रयोग मांडणा-या आणि
या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत
समजावून देणा-या कथा.
मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी
'शाळा घरात अन् घर शाळेत' नेणारी
ही आहे

पृष्ठसंख्या: 
108
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
September, 2015
ISBN No: 
978-81-7434-118-1

मुलाला एखादा विषय आवडणे, न आवडणे हे तो विषय
शिकवण्याच्या पध्दतीवर अवलंबून असते. शिकवण्याच्या
गंभीर, रुक्ष पध्दतीने मुले त्या विषयाला कंटाळतात. उलट
तोच विषय हसत-खेळत, गमतीदार पध्दतीने मांडला, तर
मुले त्यात रंगून जातात.

गणित हा शालेय अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा विषय.
पण बहुतेक मुलांना हा विषय म्हणजे फक्त कंटाळवाणी
किचकट आकडेमोड वाटते. हीच कंटाळवाणी ‘किचकट
आकडेमोड’ वेगळ्या रूपात, वेगळ्या वेशात मुलांपुढे आली,
तर ? आपण एक गमतीदार नवीन खेळच खेळत आहोत,
असे म्हणता म्हणता गणितातील काही महत्त्वाची सूत्रे त्यांच्या
मनात ठसलेली असतात.

दहा ते अकरा वर्षे वयोगटातील इयत्ता पाचवी-सहावीच्या
मुलांसाठी भागाकार, गुणाकार, लसावि आणि मसावि या
संकल्पनांची अशीच हसतखेळत ओळख करून देणारे हे
पुस्तक मुलांप्रमाणेच हा विषय शिकवणा-या गणित
शिक्षकांनाही उपयोगी पडेल.

पृष्ठसंख्या: 
48
किंमत: 
रु. 40
प्रथम आवृत्ती: 
1991
सद्य आवृती: 
December, 2011
ISBN No: 
978-81-7434-118-1

वाचता न येणा-या छोट्यांना
मोठयांनी वाचून दाखवावीत
आणि
वाचता येणा-या छोटयांनी
स्वतःच वाचावीत, अशी पुस्तकं
(४ ते ७ वर्षे वयोगटासाठी)

पृष्ठसंख्या: 
28
किंमत: 
रु. 25
प्रथम आवृत्ती: 
1998
सद्य आवृती: 
July, 2011
ISBN No: 
978-81-7434

मुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव
म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना
लुटणंच आहे. या अनुभवाला
बालविकासाच्या अभ्यासाची जोड दिली
आणि त्यातून उपयुक्त मनोरंजक
खेळांबद्दल माहिती तयार झाली.
मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्या
खेळांमध्ये बदलही सुचविले आहेत.

पृष्ठसंख्या: 
20
किंमत: 
रु. 12
प्रथम आवृत्ती: 
1989
सद्य आवृती: 
December, 2011
ISBN No: 
978-81-7434-018-4
अनुवाद: 
उल्हास टुमणे

‘विज्ञान खेळण्यांची दुनिया’
या पुस्तकाचे मूळ लेखक श्री.अरविंद गुप्ता
हे मूळचे इंजिनियर. गेली अनेक वर्षे
हा माणूस विज्ञानप्रसाराच्या कार्याने
झपाटलेला आहे. खेळण्यांच्या माध्यमातून
विज्ञानप्रसार ही गुप्तांची खासियत.
ती मुलांपर्यंत पोचावीत, यासाठी त्यांनी
अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘खिलौनों का बस्ता’
या पुस्तकाचा हा अनुवाद.

पृष्ठसंख्या: 
73
किंमत: 
रु. 60
प्रथम आवृत्ती: 
1994
सद्य आवृती: 
June, 2013
ISBN No: 
978-81-7434-046-7

मुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव
म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना
लुटणंच आहे. या अनुभवाला
बालविकासाच्या अभ्यासाची जोड दिली
आणि त्यातून उपयुक्त आणि मनोरंजक
खेळांबद्दल माहिती तयार झाली.
मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्या
खेळांमध्ये बदलही सुचविले आहेत.

पृष्ठसंख्या: 
28
किंमत: 
रु. 12
प्रथम आवृत्ती: 
1991
सद्य आवृती: 
December, 2012
ISBN No: 
978-81-7434-133-4

तुम्ही छोटया चिंटूचे आई-बाबा असाल,
किंवा मिनीच्या वर्गशिक्षिका असाल,
किंवा पप्पूच्या खेळांचे गटप्रमुख असाल,
तर तुम्ही घरच्या घरी मिळणा-या बिनखर्ची काडेपेटया घ्या
आणि या भन्नाट कल्पना वापरून,
सोप्या सोप्या चित्रमय सूचना वाचून
मुलांसह मोठयांनाही गुंग करणा-या अनेक वस्तू बनवा.

पृष्ठसंख्या: 
24
किंमत: 
रु. 30
प्रथम आवृत्ती: 
1996
सद्य आवृती: 
January, 2009
ISBN No: 
978-81-7434-078-8

तुम्ही छोटया चिंटूचे आई-बाबा असाल,
किंवा मिनीच्या वर्गशिक्षिका असाल,
किंवा पप्पूच्या खेळांचे गटप्रमुख असाल,
तर तुम्ही घरच्या घरी मिळणा-या बिनखर्ची काडेपेट्या घ्या
आणि या भन्नाट कल्पना वापरून,
सोप्या सोप्या चित्रमय सूचना वाचून
मुलांसह मोठ्यांनाही गुंग करणा-या अनेक वस्तू बनवा.

पृष्ठसंख्या: 
24
किंमत: 
रु. 30
प्रथम आवृत्ती: 
1996
सद्य आवृती: 
July, 2011
ISBN No: 
978-81-7434-141-9

-----

पृष्ठसंख्या: 
62
किंमत: 
रु. 60
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
July, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-169-3

छोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी
वेगळयाच दिसतात.
त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा
काहीसं वेगळं असतं - असू शकतं,
अशी माझी समजूत आहे.

त्या गोष्टींचं वर्णन करताना,
त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना,
मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत
अशा चित्रविचित्र कल्पना
आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा
निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट,
कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा
भाषा ती उधळतात.

मुलांचं हे मूलपण
माझ्या कविता-गाण्यांतून
खेळवण्याचा खटाटोप
आधीच्या 5 संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे.
हा एक ब-यापैकी उपक्रम आहे
अशी पावती मुलांच्या शाळांतून
आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या
गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून
मला वेळोवेळी मिळते आहे.
नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं.

पृष्ठसंख्या: 
24
किंमत: 
रु. 20
प्रथम आवृत्ती: 
2000
सद्य आवृती: 
August, 2008