ISBN No: 
978-81-7434-952-1

शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही.
शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश:
असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून
त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या
पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना
त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही.
अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही
असंख्य पर्यायांचा खजिना खुला !

• कॉर्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार
• स्पा : उत्साह आणि ऊर्जा
• नौदल : उत्कृष्ट जीवन, वैश्विक अनुभव
• स्मार्ट घराचे शिल्काकार
• कम्युनिकेशन डिझाइन
आणि इतर अनेक...

पृष्ठसंख्या: 
152
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
March, 2016
ISBN No: 
978-81-7434-953-8

शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही.
शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश:
असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून
त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या
पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना
त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही.
अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही
असंख्य पर्यायांचा खजिना खुला !

• पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल क्षेत्र
• पशुवैद्यक - अनोखी सेवा, अनोखी संधी
• नेव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनिअरिंग
• नर्सिंग - सेवा आणि समाधान
• चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटयूट
आणि इतर अनेक...

पृष्ठसंख्या: 
160
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
March, 2016
ISBN No: 
978-81-7434-936-1

शिक्षकांनी, पालकांनी वाचले पाहिजे,
असा उपदेश सारेच करतात;
पण नेमके काय वाचावे, हे सांगितले जात नाही.
सुदैवाने मराठीत केवळ शिक्षणासंबंधी आणि शिक्षकांना
प्रेरणा देतील अशी किती तरी पुस्तके आहेत.
त्यातली अनेक परभाषेतून अनुवादित झाली आहेत.
मात्र अशा पुस्तकांची केवळ नावे सांगितल्याने
ती वाचावीशी वाटत नाहीत;
त्या पुस्तकात काय आहे हे समजले, तर
मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते.
पिक्चरचा ट्रेलर बघितला की,
पूर्ण पिक्चर बघावासा वाटतो ना, अगदी तसे.
मराठीतल्या शिक्षणविषयक निवडक पुस्तकांचा
ओघवत्या शैलीत परिचय करून देणारे हे
'पुस्तकांविषयीचे पुस्तक'!
केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर पालकांनीही वाचावे असे.
शिक्षणविषयक जाणीव समृद्ध करणारे

पृष्ठसंख्या: 
158
किंमत: 
रु. 160
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
December, 2015
ISBN No: 
978-81-7434-896-8

आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं.
एखादा अनपेक्षित अनुभव आला की ते डोळे विस्फारतं.
एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला की सुरुवातीच्या काळात तर
आपले डोळे सदैव विस्फारलेलेच!

'आखाती देशांत जाताय?
या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय.
तिकडचे अनुभव कसे असतील?
तिथल्या कट्टर संस्कृतीशी अन् कठोर कायद्यांशी
मला जुळवून घेता येईल ना?
अरब व्यक्तीशी मी कसं वागायला हवं?
ते लोक माझ्याकडे कसे बघतील?'
असे अनेक सतावणारे प्रश्न.

थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार
देणारं, हलक्या-फुलक्या प्रसंगांमधून अरब संस्कृतीतले बारकावे
उलगडणारं, हे पुस्तक. बुरख्याआड दडलेल्या संस्कृतीतला
जीवनप्रवास सुखकारक करणारं
'कल्चर शॉक : आखाती देश'.

पृष्ठसंख्या: 
148
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
July, 2015
ISBN No: 
978-81-7434-895-1

आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं.
एखादा अनपेक्षित अनुभव आला, की ते डोळे विस्फारतं.
एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला, की सुरूवातीच्या काळात
तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच!

'जपानला जाताय?
या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय.
तिकडचे अनुभव कसे असतील?
जपानी लोकांशी मी कसं वागायला हवं?
ते लोक माझ्याकडे कशा नजरेनं बघतील?
त्यांच्या अतीकाटेकोरपणाशी आणि यांत्रिक शिस्तीशी
मला जुळवून घेता येईल का?
तिथे मला कच्चे मासे आणि बेचव पदार्थ खाऊन
दिवस काढावे लागतील का?'
असे अनेक सतावणारे प्रश्न.

थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार
देणारं, हलक्या-फुलक्या प्रसंगांमधून जपानी संस्कृतीतले बारकावे
उलगडणारं हे पुस्तक. त्यांच्या स्मितहास्याच्या मुखवटयाआड
दडलेल्या जपानी संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं
'कल्चर शॉक : जपान'.

पृष्ठसंख्या: 
144
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
July, 2015
ISBN No: 
978-81-7434-886-9

आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं.
एखादा अनपेक्षित अनुभव आला, की ते डोळे विस्फारतं.
एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला, की सुरुवातीच्या काळात
तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच!
'जर्मनीला जाताय?
या देशाबद्दल तर बरंच काही उलट-सुलट ऐकलंय.
तिकडचे अनुभव कसे असतील?
जर्मन भाषेशिवाय तिकडे माझं कितपत अडेल?
तिकडच्या त्या थंडगार हवामानाशी आणि वृत्तीशी मला जुळवून
घेता येईल का?
जर्मन लोकांशी मी कसं वागायला हवं? ते लोक माझ्याकडे
कशा नजरेनं बघतील?'
असे अनेक सतावणारे प्रश्न.
थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल
आधार देणारं, हलक्या, फुलक्या प्रसंगांमधून जर्मन संस्कृतीतले
बारकावे उलगडणारं हे पुस्तक. कठोर शिस्तीच्या मुखवटयाआड
दडलेल्या जर्मन संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं
'कल्चर शॉक : जर्मनी'

पृष्ठसंख्या: 
134
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
July, 2015
ISBN No: 
978-81-7434-738-1

 धडपडणा-या तरुणाईसाठी
 हम होंगे कामयाब
 उठा,जागे व्हा!
ही तीन पुस्तके आणि त्यांचे लेखक संदीपकुमार साळुंखे
आजच्या तरुण पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत.
अक्षरशः हजारो तरुण-तरुणींना, पालकांना आणि शिक्षकांनासुद्धा
प्रगतीची प्रेरणा देणा-या आणि विकासाच्या वाटा दाखवणा-या
या लेखकाने समुपदेशनाचे एक आगळे व्रत अंगीकारले आहे...

खरी प्रेरणा आपल्या आतच असते
ती पेटवायची असते आपणच
आणि फुलवायचीही असते आपणच...
हे स्वतःच्या उदाहरणाने पटवून देत
त्यांनी सादर केलेला एक आगळावेगळा सुसंवाद!

निराश तरुणाईला आशावादी, महत्त्वाकांक्षी बनवणारा...
प्रत्येकाच्या अंतरीचा दिवा प्रज्वलित करणारा!

पृष्ठसंख्या: 
294
किंमत: 
रु. 275
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
June, 2014
ISBN No: 
978-81-7434-733-6

पालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो,
करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल,
तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे.
असंख्य क्षेत्रे तुमच्या पाल्याच्या कर्तृत्वाला आवाहन करीत आहेत.
आपल्या पाल्याचा कल प्रामुख्याने विज्ञानेतर विषयाकडे असेल,
तर त्याला उपलब्ध होऊ शकणाऱ्या
असंख्य अभ्यासक्रमांची माहिती करून घेण्यासाठी
अवश्य वाचले पाहिजे, असे पुस्तक...

पृष्ठसंख्या: 
88
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
May, 2014
ISBN No: 
978-81-7434-732-9

पालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो,
करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल,
तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे.
असंख्य क्षेत्रे तुमच्या पाल्याच्या कर्तृत्वाला आवाहन करीत आहेत.
आपल्या पाल्याचा कल प्रामुख्याने विज्ञानाकडे व
त्याच्या विविध शाखांकडे असेल,
तर त्याला उपलब्ध होऊ शकणाऱ्या
असंख्य अभ्यासक्रमांची माहिती करून घेण्यासाठी
अवश्य वाचले पाहिजे, असे पुस्तक...

पृष्ठसंख्या: 
96
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
May, 2014
ISBN No: 
978-81-7434-049-1

मनुष्यबळ व्यवस्थापनशास्त्राची मराठी वाचकाला ओळख करून
देण्याचा हा प्रयत्न.

हा ग्रंथ आहे दोन भागांत.

पहिला भाग – मनुष्यबळ व्यवस्थापनाची व्याख्या, व्याप्ती अन्
विकासाचा मागोवा घेणारा.

दुसरा भाग – औद्योगिक संबंध, औद्योगिक लोकशाही, कामगार
संघटना, औद्योगिक शांतता, सामुदायिक देवाण-घेवाण अशा
नव्या-जुन्या संकल्पनांची ओळख करून देणारा. औद्योगिक शिस्त,
कर्मचा-यांची गा-हाणी अन् त्यावरची उपाययोजना या पैलूंची
मांडणी करणारा.

मनुष्यबळ विकासाचे एकविसाव्या शतकातील चित्र रेखाटणारा हा
ग्रंथ सामान्य वाचकांबरोबरच जिज्ञासू विद्यार्थी आणि औद्योगिक
क्षेत्रातील तज्ज्ञांनाही मार्गदर्शक ठरेल.

पृष्ठसंख्या: 
424
किंमत: 
रु. 300
सद्य आवृती: 
January, 2003