ISBN No: 
978-81-7434-124-2

हॅम्लेट - ''बोलण्यात नेमस्तपणा ठेवला
म्हणजे भाषण चित्तवेधक होते. पुष्कळदा
कर्कश नट 'क्यें' करून जेव्हा ओरडतात,
तेव्हा माझ्या पायाची आग मस्तकात चढते.
असल्या मूर्खपणाने रस उत्पन्न न होता
भाषणाच्या चिंधडयान् चिंधडया होतात.

''पण, त्राटिकेचा सूर काढू नको असे म्हटले
म्हणून आपला तोंडातल्या तोंडात मुळमुळ
करीत बसशील. पण तेही उपयोगाचे नाही.
या कामात ज्याची त्याने अक्कल खर्चिली
पाहिजे; पढवून किती येणार? भाषण आणि
अभिनय ही एकमेकांना जुळून चालली
पाहिजेत.

''हजारो अरसिक प्रेक्षकांनी टाळी दिली, पण
सहृदय प्रेक्षकांपैकी एकाने जरी नाक मुरडले,
तरी सर्व खेळावर पाणी पडले, असे तुम्ही
मानले पाहिजे. असे कित्येक नाटकवाले
आहेत की, ज्यांची अरसिक व मूर्ख लोक
पराकाष्ठेची वाखाणणी करीत असतात, पण
त्यांच्यात गुण म्हणाल तर काडीचादेखील
नसतो. हे बेटे मनुष्यस्वभावाची इतकी खराब
बतावणी करतात की, त्यामुळे मला कधी
कधी वाटते की, या लोकांना आमच्या
नेहमीच्या ब्रह्मदेवाने घडविलेले नसावे, तर
त्यांच्याकरिता कोणी तरी भाडोत्री ब्रह्मदेव
धरून आणला असावा.''
- शेक्स्पिअर

(भाषांतर : गोपाळ गणेश आगरकर)
इ. स. 1883

पृष्ठसंख्या: 
96
किंमत: 
रु. 90
प्रथम आवृत्ती: 
1998
सद्य आवृती: 
October, 2010
ISBN No: 
ISBN 978-81-7434-152-5

जागतिक चित्रपटांच्या इतिहासात चिरस्थायी लेणी बनलेले
गॉन विथ द विंड / द गॉडफादर / कॅसाब्लांका / सायको /
लॉरेन्स ऑफ अरेबिया / २००१ : अ स्पेस ओडिसी
हे हॉलीवुडचे सहा चित्रपट.

पावलोपावली संघर्ष, अडथळे, कोंडी, आणि वैफल्य
अशा भोवंडून टाकणा-या क्षणांनी नाटयपूर्ण बनलेल्या
या त्यांच्या निर्मिती कथा.

पृष्ठसंख्या: 
176
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
August, 1999
ISBN No: 
ISBN 978-81-7434-483-0

सुंदर ती दुसरी दुनिया सिनेमा खोटा असतो, परंतु आयुष्य किती किती त-हेनं खरं असतं ते
दाखवण्याची कुवत कॅमे-यात असते. हे लक्षात ठेवून सिनेमे निघत होते,
तो हिंदी चित्रसृष्टीचा सुवर्णकाळ.
सिनेमा हा लोकांचा असतो. लोकांनी, लोकांसाठी केलेला. परंतु मनोरंजनाची
सबब पुढे करून सिनेमा झुंडीच्या हाती जाता नये. सिनेमावाल्यांनी कला आणि
करमणूक यातला समतोल छान साधला. 1930 ते 1960 या तीन दशकांत
हे घडलं. म्हणून हा हिंदी सिनेमाचा वैभवकाळ.
'पाहता पाहता' सिनेमा मोठा झाला. त्याची ही गोष्ट.
सिनेमाला बरकत यावी म्हणून अनेक थोर कलावंत, दिग्दर्शक, लेखक,
संगीतकार आणि तंत्रज्ञ झिजले. 'निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा' होऊन जगले.
त्यांची ही गोष्ट.
प्रत्येकाच्या मनात सिनेमाची एक सुंदर दुनिया वसत असतेच.
मनाला हुरहूर लावणारं ते जग या पुस्तकात वस्तीला आलंय.

पृष्ठसंख्या: 
192
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
January, 2010

ही काही चटपटीत मांडणीची आणि चविष्ट माहितीची वर्तमानपत्री मुलाखत नाही. हा अंतर्मुख करणारा, विचार करायला लावणारा सर्जनशील वैचारिक संवाद आहे. प्रश्न विचारणारा आणि उत्तरे देणारा दोघेही सर्जनशील लेखक आहेत आणि ते प्रामाणिकपणे आपल्या विचारांचा शोध घेत आहेत, त्यांचा अर्थ समजून घेत आहेत. त्यांनी घेतलेल्या या शोधाचा वाचक म्हणून मागोवा घेत असताना आपण आपल्याही विचारांचा, दृष्टिकोनांचा शोध घेऊ लागतो, पापणी जागी ठेवून स्वत:कडे पाहू लागतो. याहून अधिक काय हवे?
मंगेश पाडगावकर

किंमत: 
रु. 150
सद्य आवृती: 
October, 2011