--

पृष्ठसंख्या: 
400
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
July, 2007
ISBN No: 
978-81-7434-354-3

सिंधु संस्कृती' म्हटले की आपले मन प्राचीन काळाकडे खेचले
जाते. शेकडो वर्षे आपल्या विस्मरणात गेलेल्या त्या संस्कृतीचे
अवशेष १९२१-२२ साली अचानक प्रकाशझोतात आले आणि
भारतीय इतिहासाबद्दलच्या देशीविदेशी विद्वानांच्या कल्पना पूर्णपणे
बदलल्या. आपल्या भारतीय भूमीत सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी
नांदत असलेल्या त्या अत्यंत वैभवशाली संस्कृतीचा म्हणावा
तसा परिचय मात्र अजूनही सर्वसामान्यांपर्यंत पोचलेला नाही. ती मोठी
सांस्कृतिक उणीव भरून काढणारे हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.

सिंधु संस्कृतीतील वैशिष्टयपूर्ण नगररचना, समाज आणि
शासनयंत्रणा यांचे परस्परसंबंध, तत्कालीन समाजाच्या विविध
धार्मिक व आर्थिक समजुती, त्या लोकांची सौंदर्यदृष्टी व
कलासाधना... या आणि इतरही अनेक अंगांनी त्या पुरातन
संस्कृतीचा वेध घेणारे हे पुस्तक एका व्यासंगी प्राच्यविद्यापंडिताने
लिहिले आहे. सामान्यांना सहज समजेल अशा शैलीत लिहिलेले हे
पुस्तक वाचकांचे कुतूहल शमवील, जिज्ञासा जागी करील आणि
प्राचीन इतिहासाकडे डोळस नजरेने पाहण्याची प्रेरणा देईल.

पृष्ठसंख्या: 
94
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2006
सद्य आवृती: 
September, 2009
ISBN No: 
978-81-7434-863-0

ऑ ??
पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ?
अजिबात नाही !
शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते,
मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते,
चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन्
रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते.
आणि या साऱ्याबरोबरच हा जाणता राजा
कुशल, धोरणी अन् यशस्वी अर्थतज्ज्ञ होता.
नंतर भारतभर पसरलेल्या मराठी साम्राज्याचा
भक्कम पाया होता
श्रीशिवरायानी राबवलेले खंबीर अर्थधोरण.
महाराजांच्या या यशस्वी अर्थकारणाचा साक्षेपी परिचय म्हणजेच
श्रीशिवराय

पृष्ठसंख्या: 
166
किंमत: 
रु. 150
सद्य आवृती: 
May, 2015
ISBN No: 
978-81-7434-912-5

1962. साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युध्दात आपला
दारुण पराभव झाला. जगभर त्यामुळे आपली मानहानी झाली.
म्हणून ती ठरली 'न सांगण्याजोगी गोष्ट'!
तथापि आपली राष्ट्रीय संरक्षणसिध्दता वाढवायची असेल,
तर 'त्या' पराभवाची परखड कारणमीमांसाही करायलाच हवी.
'त्या' शोकांतिकेला कोणकोण जबाबदार होते?
चीनवर नको तेवढा विश्वास टाकणारे भोळेभाबडे राज्यकर्ते?
की राणा भीमदेवी थाटात 'फॉरवर्ड पॉलिसी' आखणारे सेनाधिकारी?
त्या युध्दात नेमके काय घडले, कसे घडले आणि का घडले?
'त्या' पराभवाला एखाददुसरी तरी रुपेरी कडा होती का?
या आणि अशा इतरही असंख्य प्रश्नांची साधार,
तपशीलवार उत्तरे देणारा हा ग्रंथ म्हणजे
युध्दशास्त्रविषयक मराठी साहित्यात मोलाची भर आहे.
प्रत्यक्ष रणक्षेत्राची व व्यूहरचनांची कल्पना देणारे 25 नकाशे
हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्टय आहे.
एका रणझुंजार सेनानीने इतिहासकाराच्या भूमिकेतून लिहिलेला
हा ग्रंथ देशहिताबद्दल कळकळ असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवा...

पृष्ठसंख्या: 
418
किंमत: 
रु. 375
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
September, 2015
ISBN No: 
978-81-7434-818-0

टाटा,
भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत.
त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव.
सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली,
सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली,
पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली
भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती.
टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे
लक्ष्मी-सरस्वतीचा संगम.
सालंकृत तरीही सात्त्विक.
ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत.
जमशेटजी आणि दोराबजींपासून
जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत
सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं
उद्योगतोरण म्हणजेच
टाटायन!

पृष्ठसंख्या: 
438
किंमत: 
रु. 400
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
January, 2015
ISBN No: 
978-81-7434-138-9

‘अशी होती शिवशाही ’ हा रूढार्थाने शिवशाहीचा इतिहास
नाही. ‘म-हास्ट राज्या’चे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दांत इतिहासाच्या
समकालीन अस्सल साधनांवरून उकलून दाखवण्याचा प्रयत्न
येथे केला आहे. शिवाजीराजे हे केवळ लष्करशहा नव्हते , तर
‘बहुतजनांसी आधारु’ असे ‘श्रीमंत योगी’; जाणते, रचनात्मक
कार्य करणारे, काळाच्या पुढे जाणारे मुत्सद्दी राजे होते, हे
त्यांच्या विविध धोरणात्मक पत्रांवरून येथे मांडले आहे. हे
राज्य सर्वांचे आहे, असा पक्का अभिमान त्यांनी मराठी
माणसांत निर्माण केला. ‘मोडिले राज्य तिघे ब्राह्मण आणि
तिघे मराठे सावरतील ’, असा आत्मविश्वास त्यांना होता. ‘रात्रंदिन
आम्हां युध्दाचा प्रसंग ’ हे मनात बाळगून मोठ्या झुंझारपणाने
मराठे स्वातंत्र्यासाठी लढले. सामान्य वाचक डोळ्यांसमोर
ठेवून, इतिहासाशी इमान राखून, पण ललित अंगाने ‘शिवशाही’
लोकांपर्यत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

पृष्ठसंख्या: 
140
किंमत: 
रु. 160
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
September, 2012
ISBN No: 
978-81-7434-139-6

‘पुण्याचे पेशवे ’ हा अठराव्या शतकातील भारताच्या
इतिहासाचा धावता आढावा आहे. अठरावे शतक हे मराठ्यांचे
शतक होते आणि उपखंडातील राजकारणाची सूत्रे दीर्घकाल-
पर्यंत पुण्याहून हलवली जात होती. ‘शाहू कालखंडात’
सातारा ही मराठ्यांची राजधानी होती, पण पेशव्यांनी राजकीय
हालचालींच्या दृष्टीने पुणे हे आपले निवासस्थान पहिल्या
बाजीरावाच्या कारकिर्दीत बनवले आणि ‘शनिवारवाडा ’ देशाच्या
राजकारणाचा मध्यबिंदू बनला. या शनिवारवाड्याचे निवासी
पहिला पेशवा ‘बाळाजी विश्वनाथ’ वगळला, तर इतर सहा
पेशव्यांची जीवनचरित्रे इथेच घडली, म्हणून महाराष्ट्र राज्याचे
पेशवे ‘पुण्याचे पेशवे ’म्हणून इतिहासात ओळखले जाऊ
लागले. त्या पुण्याच्या पेशव्यांच्या आयुष्यातील चढउतार
ऐतिहासिक साधनांच्या मर्यादेत राहून, सोप्या भाषेत, थोडक्यात
निवेदन करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य वाचक डोळ्यांसमोर
ठेवून केला आहे.
‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. पुण्याच्या सांस्कृतिक
जीवनाचा आढावा घेऊन पुण्याने महाराष्ट्राला गती कशी
दिली, हे समजावून घेण्याचा प्रयत्न शेवटी केला आहे.

पृष्ठसंख्या: 
144
किंमत: 
रु. 130
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
August, 2013
ISBN No: 
978-81-7434-010-8

आपल्या उपसंहारात शेजवलकर लिहितात—
‘मग मराठे पानिपतावर कशासाठी लढले म्हणायचे? अशासाठी
की, दिल्लीची पातशाही राखण्याचे जे कार्य त्यांनी करार करून
अंगावर घेतले होते, ते पार पाडण्यासाठी आणि अब्दालीसुध्दा
एका उच्च व त्याच्या दृष्टीने न्याय्य कर्तव्यासाठीच लढला.
हे कर्तव्य हिंदुस्थानातील इस्लामचे रक्षण हेच होय.’
आणि पुढे लिहितात, ‘ मराठ्यांनी अनेक चुका केल्या असतील,
पण त्यांनी पाचशे वर्षांच्या इस्लामी वरवंट्याखाली चुरडलेल्या
हिंदु प्रजेस आपल्या वर्तनाने ताठ उभे राहण्यास उदाहरण घालून
दिले होते. मराठ्यांनी मुसलमानी राज्ययंत्र इतके खिळखिळे केले
होते की, कोणत्याही प्रदेशात तेथील प्रजेने बंड करून उठून
मुसलमान सुभेदारास हाकून द्यावे व स्वत:चे राज्य स्थापावे.
या कामात त्यांस मराठ्यांची मदत आपोआप मिळाली असती
आणि हीच शिवछत्रपतीनिर्मित मराठी राज्याची इतिकर्तव्यता होती !
इतर प्रांतांतील लोकांत हे लोण पोहोचू शकले नाही,
हीच मराठ्यांच्या इतिहासातील खरीखुरी शोकांतिका होय,
पानिपताचा पराभव नव्हे!’

पृष्ठसंख्या: 
232
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
1961
सद्य आवृती: 
May, 2011
ISBN No: 
978-81-7434-451-9
पृष्ठसंख्या: 
52
किंमत: 
रु. 30
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
March, 2009
ISBN No: 
978-81-7434-180-8

‘कंपनी सरकार’ म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या
महाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि
महाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास.
इंग्रजांनी कंपनीच्या रूपाने, महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावर
आपले प्रथम पाय टेकले, पण शिवशाहीत त्यांना किना-यावरच
रोखले गेले. नंतरच्या काळात, प्रथम आपले त्यांनी स्थान
उत्तर भारतात बळकट करून महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास
प्रारंभ केला. मराठ्यांचे शत्रू हेरून त्यांना आपले मित्र बनविले.
पानिपताच्या दारुण पराभवानंतर, मराठी मुलखात सुरू झालेले
गृहकलह, सरदारांच्या प्रभावामुळे दुभंगत चाललेली मराठी
सत्ता, विकलांग झालेली दिल्लीची पातशाही, या सर्व राजकीय
अस्थिरतेचा फायदा उठवून, कंपनीने हिंदुस्थानच्या राजकारणाची
सूत्रे,हातात घेतली. १८१८ ते १८५७ या सुमारे चाळीस
वर्षांच्या काळात महाराष्ट्रात कंपनीचा अंमल होता. १८५७
च्या उठावानंतर सारा देशच इंग्रजांनी बळकावला आणि या
उपखंडात वसाहतीचे राज्य निर्माण झाले.

‘अशी होती शिवशाही’ आणि ‘पुण्याचे पेशवे’ या ‘महाराष्ट्राचा
पूर्वरंग’ या मालेतील ‘कंपनी सरकार’ म्हणजे महाराष्ट्राला
मिळालेला ‘शाप की वरदान’, याचा अल्पसा विचार करून हा
शेवटचा भाग सादर करून या मालेला पूर्णविराम दिला आहे.

पृष्ठसंख्या: 
194
किंमत: 
रु. 180
प्रथम आवृत्ती: 
2000
सद्य आवृती: 
August, 2012