कादंबरी
ISBN No: 
978-81-7434-929-3

परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या
लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे...
संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं,
पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून
गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या.
चोरांची आणि 'थोरां'चीही स्वप्नं एकजीव झाली.
मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला.
शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या
एफएसआयचा बाजार गरम केला गेला !
तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या
सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...

पृष्ठसंख्या: 
818
किंमत: 
रु. 800
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
November, 2015
ISBN No: 
978-81-7434-885-2

1884 साली प्रकाशित झालेली
ही आहे मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी.
समकालीन वास्तवाचे वर्णन करणारी काल्पनिक कथा.
तत्कालीन समाजातील सर्वसाधारण स्तरावर वावरणारी पात्रे.
साधी, सोपी, निरलंकार तरीही सुंदर भाषा.
ठाशीव व्यक्तिवर्णने अन् रेखीव व्यक्तिचित्रणे.
सहज घडणारी तरी खटकेबाज संभाषणे.
लौकिक आणि व्यावहारिक पातळीवरचेच, पण नाटयपूर्ण प्रसंग.
अशा विविध वैशिष्टयांनी नटलेली ही कादंबरी म्हणजे
जणू आजच्या कितीतरी लोकप्रिय कलाकृतींच्या
मूळ छटा दाखवणारी साहित्यकृती.
रसिक वाचकाला रिझवणारी,
व्यासंगी अभ्यासकाची जिज्ञासा पुरी करणारी,
एकोणिसाव्या शतकातील गाजलेली कादंबरी.

पृष्ठसंख्या: 
196
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
July, 2015
ISBN No: 
978-81-7434-881-4

श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य...
उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम...
बुध्दिमत्ता कूटनीती आण धाडस यांच्या जोरावर
बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार !

ही गोष्ट सुरू होते 1670 साली
शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा.
पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना
या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला !
कुठे गडप झाला हा खजिना ?
काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ?

शिवकालातील अस्सल संदर्भ.
वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती.
अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं
ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल
अस्सल मराठी थ्रिलर !

पृष्ठसंख्या: 
504
किंमत: 
रु. 500
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
July, 2015
ISBN No: 
978-81-7434-815-9

छोटा पडदा भारतात येऊन सुमारे पन्नास वर्षं लोटली.
बघता बघता त्याची व्याप्ती किती मोठी झाली!
त्यावरून शेकडो मालिका वाहू लागल्या.
त्या मालिकांतली माणसं प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटू लागली...
ती लोकांची दैनंदिन गरज झाली... रोजच्या चहासारखं व्यसनच...

आणि मग...
जाहिरातदारांनी छोटया पडद्याचा ताबाच घेतला.
छोटया पडद्याभोवती मोठं अर्थकारण खेळू लागलं.
राजकारणाचे डावपेच सुरू झाले.
कला-साहित्य आणि माणूस सगळयांचंच खपाऊ असणं गरजेचं होऊन बसलं.

या डावपेचांचं लक्ष्य ठरला - धनंजय चांदणे!
खेडयातला एक सामान्य तरुण...
छोटया पडद्याचं लक्ष त्याच्याकडे वळलं आणि पाहता पाहता काय घडलं?

कला-साहित्य आणि समाज यांच्या मूल्य-व्यवस्थांमध्ये
प्रचंड उलथापालथ करून टाकणा-या
छोटया पडद्यामागच्या भयाण वादळाला चित्रित करणारी ही कादंबरी.

नाटक-चित्रपट-मालिका या दुनियेत वावरणारे संवेदनशील रंगकर्मी
अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून साकार झालेली

अॅट एनी कॉस्ट

पृष्ठसंख्या: 
382
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
January, 2015
ISBN No: 
978-81-7434-764-0

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम
आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही
आई फक्त आई नसते!
आईच्या ठोकळेबाज भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या
आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी.
नाटक पाहताना वाटतं की हे खरं आहे आणि
जगताना वाटतं की किती नाटकं करतात माणसं.
खोटी असू शकते छापून आलेली बातमी आणि
खरं असू शकतं एखादं स्वप्नदृश्य.
घटना प्रत्यक्षात घडल्यात की कल्पनेत?
आपल्या आयुष्यात की दुसऱ्याच्या?
माणसांचं हे बिंब आहे की प्रतिबिंब?
सत्य-असत्यामधील धूसर रेषा सारखी हलते का आहे?
खरंच का... वास्तव असतं काल्पनिक?

पृष्ठसंख्या: 
435
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
July, 2014
ISBN No: 
978-81-7434-734-3

कॉलेजचं पहिलं वर्ष
नव्याची उत्कंठा, रॅगिंगची भीती.
टेस्ट, प्रॅक्टिकल, परीक्षा
अन् मस्ती, गॅदरिंग, ट्रिप, दंगा, प्रेमसुध्दा!
ही कहाणी फक्त ओमची नाही.
ती म्हटली तर आपल्या सा-यांचीच आहे.
ही कहाणी आहे तरुण वयात पाऊल टाकतानाच्या
अवस्थांतराची.
तिला व्यक्तिगत संक्रमणाचा संदर्भ आहे,
तसाच जागतिकीकरणाच्या आरंभखुणांचाही.
हा कहाणीपट जसा ओमच्या वाढीचा आहे,
तसाच त्याच्या मित्रमैत्रिणी, पालक, शिक्षक, भवताल -
या सा-यांच्या बदलाचाही आहे.
या वयातला रम्य सळसळता प्रवास म्हणजे
पुढच्या आयुष्याच्या पोटात जपली जाणारी
मखमली आठवण.
ती आठवण उलगडणारी कादंबरी

पृष्ठसंख्या: 
240
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
June, 2014
ISBN No: 
978-81-7434-632-2

ही आहे एक धमाल कहाणी.
ती घडते देवनगरीत म्हणजे तुमच्या आमच्या सभोवती.
आपण डोळे उघडून बघायला मात्र हवं.
देव, धर्म, संस्कृती अन् परंपरेच्या व्यापारीकरणात
हृदयातला ईश्वर हृदयातच हरवतो.
उत्तर आधुनिक काळात तरी आपण
विवेक हा तारणहार, समता हा ईश्वर
अन् प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा
ही त्रिसूत्री मानणार आहोत का?
निकोप समाजजीवन अन् विवेकशील नागरिकत्व
डोळसपणे अंगात मुरवणार आहोत का?
गमतीजमतीतून नवोत्तर युगातील धर्मचिकित्सा करणारी
हसत-हसवत, गुदगुल्या करत
वाचकांना विचारप्रवण करणारी कांदबरी

पृष्ठसंख्या: 
300
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
December, 2013
ISBN No: 
978-81-7434-076-4

स्त्री-पुरुष संबंधांचा तटस्थपणे वेध घेणारी कादंबरी...

स्त्री-पुरुष नात्याचा एवढा धीट व नि:संकोच शोध
मराठी कादंबरीत क्वचितच कोणी घेतला असेल. या
नात्याची अपरिहार्यता, सनातन गुंतागंत, पुरुषाचा उर्मट,
आक्रमक अहंकार व त्यातून स्पष्ट होणारे त्याचे जन्मजात
दुबळेपण व अपुरेपण आणि त्याचबरोबर वरवर दुबळ्या
व परावलंबी वाटणा-या स्त्रीचे संयत, स्वयंपूर्ण व स्वयंभू
असे आंतरिक सामर्थ्य—

विजय तेंडुलकरांचे वैशिष्टय असे की, तत्त्वचिंतकाची
भूमिका न घेताही सरळ, साध्या प्रसंगांच्या मालिकांमधून
ते या नर-मादी संबंधातील आदिस्तर कधी हळुवारपणे,
तर कधी प्रक्षोभक रीत्या उलगडत जातात.

खरे तर ही कहाणी आहे एका चौकोनी कुटुंबाची; किंवा
त्या कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखाची, भूकंपाप्रमाणे गदगदून
हलवणा-या त्याच्या वासनामय स्वप्नाची, त्याच्यातील
हट्टी पुरुषाची. पण तेंडुलकरांच्या स्पर्शाने ही कहाणी
होऊन जाते ती सर्वसर्जनशील अशा आदिम स्त्री-शक्तीची.

पृष्ठसंख्या: 
264
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
1996
सद्य आवृती: 
October, 2012
ISBN No: 
978-81-7434-003-0

टिळक, आगरकर, गांधी-नेहरू
जन्मालाच यावे लागतात, कॉम्रेड कनू!
परिस्थितीची एक गरज म्हणून
काळच असे महापुरुष
वेळोवेळी जन्माला घालत असतो.
आणि त्यांचीच जीवनचरित्रं अखेर
इतिहासाच्या पुस्तकांची पानं
व्यापून टाकत असतात.
खालच्या फळीतली
मोजकी मध्यमवर्गीय माणसंही
आपापल्या परीनं समाजासाठी
काही करण्यच्या प्रयत्नात असतात.
ती इतिहासाच्या पुस्तकात नसलं, तरी
परिशिष्टात निश्चितच स्थान मिळवतात.
बाकी कोट्यवधी जनसामान्यांची तर
इतिहास दखलही घेत नसतो!
इतिहासाच्या परिशिष्टात समावेश
होऊ शकणा-या व त्याबाहेरही असणा-या
अनेकांची विश्लेषणात्मक जीवनकहाणी...

पृष्ठसंख्या: 
428
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
1994
सद्य आवृती: 
March, 1994

कादंबरीकाराची कसोटी कथानकरचनेपेक्षा
पात्रचित्रणामध्ये जास्त लागते. राईलकरांसारखा
नवा कादंबरीकारसुध्दा या कसोटीत यशस्वी होताना
दिसतो. राईलकरांनी चित्रित केलेली पात्रं सरळ
असली, तरी त्यांचं चित्रण उथळ नाही. बाह्यात्कारी
मौनाचे क्षण टिपताना अंतरीच्या खोल खळबळीचं भान
राईलकरांना पुरेसं असतं, हे सहृदय वाचकांच्या लक्षात
आल्याशिवाय राहणार नाही.
या कादंबरीतला आणखी एक आनंद देणारा भाग
म्हणजे तिच्यातल्या जीवनदर्शनाला असलेलं
वैज्ञानिकतेचं अस्तर. मूत्रपिंड आरोपणाच्या
शस्त्रक्रियेच्या आगलामागला तपशील या
कादंबरीतल्या मनोज्ञ जीवनदर्शनाला एक वेगळंच
बौध्दिक परिमाण प्राप्त करुन देतो. या योगे
मराठीतल्या विज्ञानकथांच्या दालनामध्ये मोलाची भर
पडू शकेल.
‘मानसकन्या’च्या निमित्तानं, मराठी साहित्यक्षेत्रात
स्थिरपद होऊ शकेल असा एक नवा लेखक पुढे येत
आहे. त्याच्याकडून अधिक अपेक्षा करावी, आशा
बाळगावी, इतपत निर्वाळा प्रस्तुत कादंबरी
निश्चितच देते.

पृष्ठसंख्या: 
114
किंमत: 
रु. 20
प्रथम आवृत्ती: 
1984
सद्य आवृती: 
October, 1984