नवे वर्ष कवितेचे......

प्रिय कवि मित्रमैत्रिणींनो,

हा आहे `राजहंस ग्रंथवेध'चा नव्या वर्षाचा संकल्प..
तुमच्या कवितांसाठी `राजहंस ग्रंथवेध'मध्ये सुरू करतोय खास काव्य विभाग.
तुम्ही लिहिलेल्या कविता आमच्याकडे पाठवा.
संपादकांना योग्य वाटणा-या कविता नव्या वर्षापासून म्हणजेच जानेवारी 2014 पासून `राजहंस ग्रंथवेध'मध्ये प्रसिद्ध होतील.
.....
आपल्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्याच्या इच्छेनं अनेक कवी-कवयित्री `राजहंस'मध्ये येत असतात. अगदी अठरावीस वर्षांच्या तरुणांपासून ते पंचाहत्तर वयापर्यंतच्या व्यक्ती यात असतात. आपली कवितांची वही प्रकाशनासाठी आमच्याकडे पाठवणारे एक गृहस्थ तर पंचाण्णव वर्षांचे होते.
हे दिसल्यावर वाटतं, सर्व वाड्मय प्रकारांत माणसाचा ओढा उपजतपणे काव्यनिर्मितीकडे असतो. आपल्या अनेकांच्या मनात काव्याचे भावतरंग उठत असतात. कवितेचे उन्मेष फुलारत राहतात. एकत्र येऊन कविता वाचणं आणि ऐकणं असा उपक्रम बरीच सखीमंडळं आणि मित्रमंडळं यातून चाललेला असतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनातही काव्यवाचन रात्र रात्र चाललेले असते.
काही अपरिहार्य कारणांमुळे आणि अन्य प्रकल्पांमधील व्यग्रतेमुळे काव्यसंग्रहाचे प्रकाशन `राजहंस'ला शक्य होत नाही; पण तुमच्या मनात उसळणा-या या कवितेच्या झ-याला मुक्तपणे खळखळण्यासाठी एक पाऊलवाट आमच्याकडूनही पुरवत आहोत.
तुमच्या सकारात्मक प्रतिसादाच्या बळावर कदाचित आजची ही पाऊलवाट वहिवाटीचा प्रशस्त राजमार्ग बनेल.
तुमच्या कविता टपालाने अथवा इ-मेलने पाठव्यात. कवितेच्या प्रती परत केल्या जाणार नाहीत.

* * *

IMG_0665.jpg
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे, राज्य शासनाच्या मराठी विभागाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून 2013 सालचा `श्री. पु. भागवत' पुरस्कार `राजहंस' प्रकाशनाला प्रदान करण्यात आला.

श्री.पुंच्या निधनानंतर सर्वोच्च कामगिरीसाठीचा हा पुरस्कार दरवर्षी एका प्रकाशन संस्थेला देण्यात येतो.
27 फेब्रुवारी 2014 रोजी संध्याकाळी 6 वा. रवींद्र नाट्य मंदीर, मुंबई येथे पुरस्कार प्रदान सोहळा   पार पडला. हा पुरस्कार मा. उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते दिला गेला व `राजहंस'चे संचालक दिलीप माजगावकर यांनी तो स्विकारला.

* * *

Gammatshala.JPG