ISBN No: 
978-81-7434-071-9
अनुवाद: 
करुणा गोखले

ज्या संस्कृतीत लहानपणापासून 'एक धागा सुखाचा, शंभर धागे
दु:खाचे' असे घोटून गिरवले जाते, तेथे दु:खाचे उदात्तीकरण होणे व
सुखाला तुच्छ लेखले जाणे स्वाभाविकच आहे. सुखाची आकांक्षा
ठेवण्यात काहीतरी आत्मिक व नैतिक अवनती आहे, असे सतत
मनावर बिंबवले जात असल्यामुळे दु:खी माणूस उगाचच सुखी
माणसाला कमी लेखतो.

`The Conquest of Happiness' या पुस्तकातून थोर तत्त्वज्ञ
बर्ट्रांड रसेल पटवून देतात की, दु:खी राहण्यात निसर्गत: काहीही
श्रेष्ठत्व दडलेले नाही. प्राप्त परिस्थितीत जो जास्तीत जास्त आनंदी
राहण्याचा प्रयत्न करतो, तो खरा सुज्ञ.

हे पुस्तक एक आश्वासन देते की, सात्त्विक सुख अप्राप्य नाही.
दंतकथेत सांगतात, तेवढा सुखी माणसाचा सदरा दुर्मीळ नाही. हाती
आलेल्या धाग्यांमधून प्रत्येक माणूस असा सदरा विणू शकतो. पण तो
स्वत:चा स्वत:ला विणावा लागतो. विणकरात, हंसाचा नीर-क्षीर विवेक
व गवळण पक्ष्याची जिद्द मात्र हवी.

पृष्ठसंख्या: 
174
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
1996
सद्य आवृती: 
February, 2013
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित