ISBN No: 
ISBN 978-81-7434-369-7

हे पुस्तक ‘गमतीदार’ आहे, ते अशा अर्थानं की,
गालांत हसण्यापासून तो थेट खळखळून धबधबा
फुटल्यासारखं हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार यातून
अनुभवता येतात.
खुमासदार शैलीतले यातले लेख खूपच वाचनीय
झाले आहेत. कधीही कंटाळा आला तर उघडावं आणि
एखादा लेख वाचून मिटून ठेवावं, असं हे पुस्तक आपल्या
मिटलेल्या चित्तवृत्ती उजळून टाकतं.
- जयवंत दळवी

प्रभावळकरांच्या विनोदात उपहासानं जग सुधारण्याचा
हेतू नसतोच. असतो तो आनंद देणं – हा एकमेव हेतू.
लावायचीच झाली, तर त्याला पुष्कळ प्रतिष्ठित लेबलं
लावता येतील; परंतु प्रभावळकरांच्या ‘असली’ विनोदाला
ती लावून नयेत, या प्रांजळ मताचा मी आहे. याचं
एकमेव कारण म्हणजे तो स्वतंत्र आहे. त्याचं घराणं
कोणतं, हा गहन प्रश्न पढीक विद्वानांवर सोपवावा.
- मं. वि. राजाध्यक्ष

पृष्ठसंख्या: 
186
किंमत: 
रु. 176
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
June, 2011
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित