ISBN No: 
ISBN 978-81-7434-368-0

दिलीप प्रभावळकर म्हणजे अभिनयनिपुण
सव्यसाची कलावंत! हा कलावंत एक
सिद्धहस्त लेखकही आहे, हे त्यांचं लेखन
वाचल्यानंतर प्रकर्षानं जाणवतं.
प्रभावळकरांचा विनोद हा गुदगुल्या
करणारा, गालातल्या गालात हसवत प्रसन्न
करणारा आहे. या विनोदाचं वैशिष्ट्य हेच
की, तो कुठलीही झूल अंगावर घेत नाही
की, विदूषकी पोझ घेत नाही.
स्वत: प्रभावळकरच एका मुलाखतीत
म्हणाले होते की, ‘मी जेव्हा नाटकात काम
करतो, तेव्हा नेहमीच्या जगण्यातले मुखवटे
काढून बाजूला ठेवतो.’ त्यांच्या लेखनाबद्दलही
हेच म्हणता येईल. ते जेव्हा लिहितात, तेव्हा
मुखवटेरहित होऊन लिहितात. सामान्य
माणसाला थेट भिडण्याचं सामथ्र्य आणि
प्रांजळपणा हे प्रभावळकरांच्या विनोदाचं
बलस्थान आहे.
- जयन्त पवार

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
साहित्य परिषदेचा ‘चिं. वि. जोशी’ पुरस्कार
पृष्ठसंख्या: 
128
किंमत: 
रु. 120
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
July, 2011
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित