ह्या ‘ती’ ला विशिष्ट नाव नाही. ‘स्त्री’ हीच तिची
ओळख. आयुष्यभर तिला सोबत फक्त नानाविध
दु:खांची!

धर्माच्या नावाखाली तिचा छळ मांडणा-या जाचक
परंपरा खंडित झाल्या ख-या, पण प्रश्न संपले
नाहीत. जगण्याच्या नव्या पद्धतीतून तिच्यासाठी
नवे प्रश्न निर्माण होतच राहिले.

यातनांचे, पीडेचे प्रकार बदलले, पण दु:खाची जात
तीच - जीवघेणी! तिचं शिक्षण, तिचं आर्थिक
स्वावलंबन, तिचं कर्तृत्व - सगळं खोटं ! खरं फक्त
तिचं ‘स्त्री’ असणं!

ती अडाणी कामकरी असो अथवा वकील, डॉक्टर,
इंजीनियर असो, तिच्या स्तरात तिला भेटणारा
पुरुष आणि त्याचा समाज तिची छळणूक करीतच
राहिला.

स्त्रीच्या जगण्याचा गेल्या शंभर वर्षांचा हा साहित्यिक
इतिहास म्हणजे खरं तर प्रत्येकीची कथा!

पृष्ठसंख्या: 
192
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
1997
सद्य आवृती: 
August, 2009
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित