तिनं पोहायला सुरुवात केली.’धरमतर’ ते ’गेटवे ऑफ इंडिया’ची खाडी; मग ’इंग्लिश’खाडी; मग ’जिब्राल्टर’खाडी; मग विषारी पाणसर्पांचा सुळसुळाट असलेली श्रीलंका ते भारतादरम्यानची ’पाल्क’ची सामुद्रधुनी; मग ’धरमतर’ एकाच फटक्यात जाऊन-येऊन; मग शार्क माशांचा सुळसुळाट असल्यामुळे पिंजर्‍यातून ऑस्ट्रेलियातली ’बास’ची सामुद्रधुनी; मग न्यूझीलंडची ’कूक’ सामुद्रधुनी आणि शेवटी दक्षिण आफ्रिकेची ’रॉबेन आयलंड’ सामुद्रधुनी. समुद्र पिऊन टाकणार्‍या अगस्ती ऋषींच्या जिद्दीनं सहा सागरांना जिंकणारी एवढीशी पोर!रौद्र लाटांत, जीवघेण्या थंडीत मासोळी होऊन पोहणार्‍या एकेकाळच्या सागरकन्येचा आणि आत्ताच्या एका यशस्वी उद्योजिकेचा हा नेत्रदीपक प्रवास!

पृष्ठसंख्या: 
264
किंमत: 
रु. 225
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित